Ad will apear here
Next
चिमुकल्यांनी केली पर्यावरणपूरक दिवाळीची तयारी
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम

पुणे : बावधनमधील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या. त्यांना या कामात पालकांनीही उत्साहाने मदत केली. रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साह्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या. 


छोटी,छोटी मुले अगदी उत्साहाने रंगीत कागदांचे कंदील बनवण्यात रंगून गेली होती. पालकही त्यांच्याबरोबर रममाण झाले होते. रंगीबेरंगी कंदील, पणत्या आणि मुलांचा उत्साह यामुळे अत्यंत उत्साहाचे, आनंदाचे वातावरण येथे निर्माण झाले होते.  
  
‘दिवाळीच्या उत्सवात आपल्या कुठल्याच कृतीतून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी,’ अशी भावना स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSUCF
Similar Posts
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी बनवल्या कचऱ्यातून कलात्मक वस्तू पुणे : सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरवले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ गोष्टींपासून अनेक नाविन्यपूर्ण कलाकृती साकारल्या असून, अश्म युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास येथे पहायला मिळतो
रोपळे गावातील पाटील विद्यालयात आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. आकाशकंदील कसा बनवावा आणि तो कसा सजवावा याची प्रात्यक्षिके विद्यार्थी-विद्यार्थिनींना दाखवून ते करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देण्यात आला
‘ट्राइब’मधील विद्यार्थ्यांची दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पुणे : दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद ट्राइब स्टुडंट अकॉमोडेशनमधील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांसोबत वाटला. ‘दिवाली विथ अ कॉज’ म्हणून या विद्यार्थ्यांनी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट येथील ७० दिव्यांग मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language